banner 728x90

“महावितरणतर्फे मान्सूनपूर्व सर्व तयारी पूर्ण; ‘ॲक्शन प्लॅन’ तयार – मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा” पालघरवासियांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा – आमदार विलास तरे

banner 468x60

Share This:

पालघर– आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत व अखंडित राहावा, तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी महावितरणने आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करावी, असे निर्देश आमदार विलास तरे यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्सून काळातील संभाव्य अडचणींवर मात करण्यासाठी सविस्तर ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला असून संपूर्ण यंत्रणा मान्सूनसाठी सज्ज असल्याची माहिती महावितरणचे कल्याण विभागाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी दिली. ही बैठक आमदारांचे जनसंपर्क कार्यालय ढेकाळे येथे झाली.

बैठकीत बोलताना आमदार विलास तरे म्हणाले की, बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये महावितरणचे पालघर व वसई असे दोन विभाग कार्यरत असून या मतदारसंघात महत्त्वाची औद्योगिक वसाहत असलेली बोईसर एमआयडीसी, मोठा आदिवासी भाग, ग्रामीण व दुर्गम गावे तसेच डोंगराळ क्षेत्राचा समावेश आहे. या भागात दरवर्षी मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे नागरिकांसह उद्योग क्षेत्रालाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान आमदार विलास तरे यांनी महाराष्ट्र विधिमंडळात लक्षवेधीच्या माध्यामतून उप केंद्र ढेकाळे करीता मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर महावितरणचे कल्याण विभागाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा म्हणाले की, उक्त बैठकीचा अनुषंगाने ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे यांच्या कार्यालयास कळविण्यात येईल, आणि त्याबाबत बैठक मंत्रालयीन स्थरावर बैठक आयोजित करण्यात येईल. पावसाळ्याच्या काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास तो शक्य तितक्या कमी वेळेत पूर्ववत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री व तांत्रिक सुविधा उपलब्ध ठेवाव्यात, असेही आमदार विलास तरे यांनी सांगितले.

banner 325x300

यावर महावितरणचे कल्याण विभागाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी सांगितले की, मान्सूनपूर्व सर्व विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतंत्र ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. विविध उपकेंद्रे, ट्रान्सफॉर्मर, विद्युत वाहिन्या आणि इतर यंत्रणांची तपासणी करण्यात आली असून आवश्यक त्या दुरुस्त्या पूर्ण केल्या जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून आवश्यक साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणची यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस आमदार विलास तरे, महावितरणचे कल्याण विभागाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, पालघर विभागाचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे, कार्यकारी अभियंता सुनील भारंबे, उपकार्यकारी अभियंता प्रकाश मालखडे, पालघर पूर्व उपविभाग सावरखंड शाखेचे कनिष्ठ अभियंता निलेश रासने, मनोर शाखेचे कनिष्ठ अभियंता अक्षय पोळ तसेच महावितरणचे अन्य अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मान्सून काळात पालघर जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित, अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!