राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असतानच शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. नेते आणि कार्यकर्ते हळुहळू उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरील विश्वास गमावत आहेत, ठाकरेंची शिवसेना २०२९ पर्यंत संपेल, असे वक्तव्य शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केले.
राज्याच्या राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरु असून, ठाकरे सेनेचे काही खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शंका बाळगू नका : ठाकरे
खासदार संजय दिना पाटील याच्याबाबतही कोणतीही शंका बाळगू नये, असे ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले, तसेच ज्यांच्या नावाबाबत चर्चा सुरू आहे, त्या खासदारांनी कार्यकत्यांशी संवाद साधून गैरसमज दूर करावेत आणि बैठकीला अनुपस्थित राहण्यामागील कारणे स्पष्ट करावीत, अशा सूचनाही देण्यात आल्याचे समजते. पक्षातील एकजूट कायम ठेवण्यावर ठाकरेंचा भर आहे.
बाळासाहेबांचा वारसा एकनाथ शिंदे चालवत आहेत, त्यांचा मतदारसंघ आणि राजकीय भविष्याच्या दृष्टीने काही निर्णय घेतला तरच यावर काही भाष्य करणे योग्य ठरु शकते. पक्षांतराचे नियम याचा विचार करुन ते काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. – आशिष जैसवाल, मंत्री
संघटना एकसंघ ठेवण्यावर भर
ठाकरे गटातील काही खासदार अलीकडील बैठकीना अनुपस्थित राहिल्याने विविध तर्क-वितकांना उधाण आले आहे. मतदारसंघांतील जिल्हाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना खासदार पक्षासोबतच असल्याचा संदेश देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पक्षात संभ्रम निर्माण होऊ नये आणि संघटना एकसंध राहावी यासाठी नेतृत्वाकडून विशेष प्रयत्न होत आहेत. (Maharashtra Politics)
आमचे खासदार कुठेही जात नाहीत संजय राऊत
उबाठा शिवसेना पक्षाचे खासदार फुटणार असल्याच्या आणि ते सत्ताधारी गटाच्या संपर्कात असल्याच्या चचर्चाना खासदार संजय राऊत यानी ठामपणे फेटाळून लावले आहे. आमचे खासदार कुठेही जात नाहीत, अफवा पसरवणे बंद करा, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले, राऊत म्हणाले की, ऑपरेशन है इस्पितळात होत असते. राजकारणात जे सुरू आहे ते फोडाफोडी आणि माणसांची खरेदी-विक्री आहे.
मात्र शिवसेनेबाबत सुरू असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही, उद्धव ठाकरे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना भेटत नाहीत, या चर्चाही त्यांनी फेटाळल्या. मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. ग्रामीण भागातील खासदार, आमदार नियमितपणे उद्धवजींना भेटतात, असे राऊत म्हणाले.
शिवसेनेचे दरवाजे २४ तास खुले : सरनाईक
ठाकरे गटातील काही खासदार पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चानी राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पाश्र्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चाना आणखी बळ मिळाले आहे. कुणी खासदार शिवसेनेत येत असेल, तर त्याचे आम्ही स्वागत करू. आमच्या पक्षाचे दरवाजे २४ तास खुले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून कोणी पक्षात प्रवेश करत असेल, तर त्याचे मनापासून स्वागत आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg