पालघर – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.. रामदास आठवले यांनी आज पालघर जिल्ह्यातील बापूगाव (लाखनपाडा) येथे जाऊन धानिवरी येथील भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. बापूगावातील लाखनपाडावर काळाने भीषण घाला घातला असून या अपघाताने संपूर्ण पालघर मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या टेम्पोला कंटेनरने दिलेल्या भीषण धडकेत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून बापूगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेतील १२ मृतांवर मंगळवारी अत्यंत दुःखद वातावरणात एकाच चितेवर आणि एकाच रांगेत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावातील वातावरण भावनिक झाले होते.
आज केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी गावात जाऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांना धीर दिला. “या दुःखद प्रसंगी आपण एकटे नाही, शासन आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असे सांगत त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच जखमींना योग्य उपचार आणि पीडित कुटुंबांना तातडीची मदत मिळावी, यासाठी प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्याचं सोबत रिपब्लिकन पक्षाचे सचिव सुरेश दादा बारर्शीग, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; एम एस नंदा,, जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, चंद्रशेखर कांबळे, देवेंद्र राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg