मुंबई – महाआघाडीच्या मंत्र्यांचा शिवाजी पार्क मैदानावर झालेला शपथविधी नियमबाह्य असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाने त्यावर आक्षेप घेतला आहे. ‘या शपथविधीवेळी आमदारांना त्यांच्या नेत्यांची नावे घेतली, हे संविधानाच्या चौकटीत बसणारे नसून नियमबाह्य आहे. त्यामुळे हा शपथविधी रद्द करावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे,’ अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
महाराष्ट्रात गेले पंधरवडाभर सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यानंतर अखेर महाविकास आघाडीचा शपथविधी समारंभ शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि तिन्ही पक्षांच्या एकूण सहा आमदारांनी शपथ ग्रहण केले. मात्र मंत्रिपदाची शपथ घेताना कुणी छत्रपती शिवरायांचे तर कुणी त्यांच्या पक्ष प्रमुखांचे नाव घेतले. अशा पद्धतीने नावे घेऊन शपथ घेणे नियमबाह्य असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. ‘महाविकास आघाडीच्या सरकारने सत्तेत आल्याआल्याच सर्व नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली आहे,’ अशी टिप्पणीही पाटील यांनी केली. खरे पाहता याविरोधात न्यायालयाकडे दाद मागायला हवी, मात्र आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे हा शपथविधी रद्द करण्याची मागणी केली आहे,’ असे पाटील यांनी सांगितले.
नव्या सरकारचा शपथविधी नियमबाह्य : भाजप
Recommendation for You

Post Views : 208 पालघर-योगेश चांदेकर पालघरः ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते…

Post Views : 208 जिल्ह्यात दरवर्षी किमान २५० कोटी रुपयांची विकास कामे नगरपरिषद, नगरपंचायत यांच्यामार्फत…

Post Views : 208 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अनुदानित रासायनिक खते उपलब्ध करून देण्यासाठी खत वितरणाची…

Post Views : 208 पालघर-योगेश चांदेकर पोलिस अधीक्षक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली पथकमुख्यमंत्र्यांचे पोलिस महासंचालकांना…

Post Views : 208 राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील अच्छाड–दहिसर मार्गावर ६ पादचारी उड्डाणपुलांसाठी निविदा…













zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg