banner 728x90

संदिग्धतेचा गैरफायदा घेत अधिकारांचा गैरवापर समर्थ वनारसे यांच्यासह अन्य विश्वस्तांची तक्रार

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर
शिक्षणाधिकाऱ्यांसह दोन ‘फिट पर्सन’विरोधात शिक्षण मंत्र्यांकडे दाद

पालघर: सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या ‘फिट पर्सन’ समितीने आनंद लक्ष्मण चंदावरकर विद्यालय, खानिवली येथे मालाड येथील शाळेतील अतिरिक्त शिक्षक माणिक गायकवाड यांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देऊन खानीवली वाडा येथे बदली करण्यात आली या आदेशानुसार शाळेच्या मुख्याध्यापकपदी नवीन नियुक्तीही करण्यात आली आहे. समर्थ वनारसे व हितसंबंधित पक्षकारांनी या संस्थेच्या कारभाराविरोधात तक्रार करताना शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांच्याविरोधातही गंभीर आरोप केले आहेत. आता थेट शिक्षणमंत्र्यांकडे दाद मागण्यात आली आहे.

banner 325x300

धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाचा संदर्भ
या आदेशासाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्त, ठाणे यांच्या आदेशाचा तसेच ‘फिट पर्सन’ समितीच्या बैठकीतील ठरावाचा संदर्भ देण्यात आला आहे. बदली शिक्षण विभागाच्या मंजुरीच्या अधीन राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. हा आदेश ‘फिट पर्सन’ समितीचे सदस्य अशोक उंबरे आणि सुनील रामचंद्र भोईर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या ‘फिट पर्सन’ समितीने सेवा आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मुरबेच्या मुख्याध्यापक वंदना राऊत यांना बदलीनंतर तातडीने पदभार सोडण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात ३० एप्रिल २०२४ रोजी पत्र जारी करण्यात आले आहे. पत्रानुसार, वंदना राऊत यांची सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील सेवा आश्रम विद्यालयात प्रशासकीय कारणास्तव मुख्याध्यापक म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी मुरबे येथील मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सोडून विशेषतः तो शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षक नसतांनाही भूपेश संखे यांच्याकडे तातडीने कार्यभार पूर्द करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांचा गटशिक्षणाधिकारी यांना आदेश
जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी त्यांच्या लेटरहेडवर वाडा गटशिक्षणाधिकारी अधिकारी यांना प्रभारी मुख्याध्यापकाचे आदेश जारी करताना सेवा आश्रम शिक्षण संस्था बोईसर संचलित असा चुकीचा शब्द वापरण्याचे कारस्थान अशोक पाटील यांनी केले वास्तविक धर्मादाय आयुक्तांनी नावात बदल करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली असताना शिक्षणाधिकारी आदेश कसा देऊ शकतात, असा सवाल आता तक्रारदारांनी केला आहे. दरम्यान, ‘फिट पर्सन’च्या अधिकारांवर निर्बंध असताना नोकरभरतीची जाहिरात कशी देऊ शकतात, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

कोट
‘या प्रकरणी आम्ही विविध वैधानिक मार्गाचा अवलंब केला आहे. आम्हाला या व्यासपीठांवर आम्हाला न्याय मिळाला नाही, तर उच्चन्यायालयात जाऊ.
समर्थ वनारसे, विश्वस्त व पक्षकार

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!