banner 728x90

बोईसर मधील कथीत शिक्षण संस्थेत गैरप्रकार : धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभागाकडे तक्रार ; लेटरहेड, शिक्के, स्वाक्षऱ्यांचा गैरप्रकार उघडकीस

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

banner 325x300

पालघरः अस्तित्वात नसलेल्या ‘सेवा आश्रम शिक्षण संस्था, बोईसर’ या कथित संस्थेच्या नावाने बनावट लेटरहेड, शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करून शैक्षणिक व आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी धर्मादाय आयुक्तांसह शिक्षण विभाग आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या संदर्भात सादर करण्यात आलेल्या निवेदनात ‘सेवा आश्रम शिक्षण संस्था, मुरबे’ ही ६३ वर्षांपासून कार्यरत असलेली नोंदणीकृत व मान्यताप्राप्त संस्था असल्याचा दावा करण्यात आला आहे; मात्र ‘सेवा आश्रम शिक्षण संस्था, बोईसर’ या नावाची कोणतीही नोंदणीकृत संस्था अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे

या कथित संस्थेच्या नावाने शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, बदली, वेतनप्रक्रिया तसेच आर्थिक व्यवहार करण्यात आले. यासाठी फिट पर्सननी लेटरहेड, शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप धर्मादाय आयुक्त आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच काही अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित आर्थिक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण (स्पेशल ऑडिट) करण्यात यावे, बनावट कागदपत्रांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून शिक्षण संस्था, विद्यार्थी, शिक्षक आणि सार्वजनिक हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी समर्थ वनारसे, यांनी निवेदनात केली आहे.

पत्ता बदलाबाबत धर्मादाय आयुक्तांचे स्पष्ट आदेश
सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या पत्ता बदलासंदर्भातील चेंज रिपोर्ट प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी २१ मे २०२४ रोजी मंजूर केलेला पत्ता बदलाचा आदेश अवघ्या महिन्याभरात रद्द करत २० जून २०२४ रोजी सुधारित आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, संस्थेचा जुना पत्ता कायम ठेवण्यात आला असून नवीन पत्ता केवळ अतिरिक्त कार्यालयाचा पत्ता म्हणून नोंदविण्यात आला आहे. तसेच अर्जदार सुनील रामचंद्र भोईर हे केवळ ‘फिट पर्सन’ असून ते संस्थेचे विश्वस्त नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सेवा आश्रम शिक्षण संस्थेचा कार्यालयाचा पत्ता मुरबे येथून बोईसर येथे बदलण्याचा प्रस्ताव चेंज रिपोर्टद्वारे सादर करण्यात आला होता. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी चेंज रिपोर्ट मंजूर करून नवीन कार्यालयाचा पत्ता अनुसूची-१ मध्ये नोंदविण्याचे आदेश दिले होते. नंतर प्रकरणाचा पुनर्विचार करण्यात आला.व सेवाश्रम शिक्षण संस्था मुरबेचे बोईसर होऊ शकणार नाही असा आदेश देण्यात आला.

वाद निकाली लागेपर्यंत मोठे बदल टाळण्याची भूमिका
संस्थेच्या वैध विश्वस्तांबाबतचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने अंतिम निर्णय होईपर्यंत संस्थेच्या मूळ नोंदीत मूलभूत बदल करणे योग्य नसल्याचे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी नमूद केले आहे. सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या प्रशासन आणि विश्वस्तांच्या अधिकारांबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा आदेश महत्त्वाचा मानला जात आहे. संस्थेच्या मूळ नोंदी, पत्ता आणि प्रशासकीय अधिकारांबाबत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणताही कायमस्वरूपी बदल न करण्याचा संकेत या आदेशातून देण्यात आला आहे


‘हे प्रकरण कोणत्याही व्यक्तीविरोधातील वैयक्तिक आरोपांचे नसून, सार्वजनिक न्यास, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित असल्याने निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे.
समर्थ वनारसे, विश्वस्त व हितसंबंधित पक्षकार, सेवा आश्रम शिक्षण संस्था, मुरबे

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!